70 राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा

हरियाणास अंतिम विजेतेपद, भारतीय रेल्वे उपविजेता

| अहमदनगर | प्रतिनिधी |

वाडिया पार्क क्रीडा संकुलातील मॅटवर झालेला अंतिम सामना पहाण्याकरीता नगरकरांनी तुफान गर्दी केली होती. पंकज मोहितेने आपल्या पहिल्याच चढाईत गुण घेत रेल्वेचे खाते उघडते. पण 10 व्या मिनिटाला 9-6 अशी आघाडी हरियाणाकडे होती. 12 व्या मिनिटाला 9-9, तर 15 व्या मिनिटाला 11-11 अशी पुन्हा बरोबरी झाली. 18 व्या मिनिटाला पंकजने हरियाणाचे शिलकी 2 गडी टिपत हरियाणावर पहिला लोण देत रेल्वेला 17-13 असे आघाडीवर नेले, सामना विश्रांतीला धांबला तेव्हा 18-15 अशी रेल्वेकडे आघाडी होती. शेवटची 5 मिनिटे पुकारती तेव्हा रेल्वेकडे 27-24 अशी आघाडी होती. शेवटची 1-2 मिनिटे असताना हरियाणाच्या आशु मलिकने शिलकी 2. गडी टिपत रेल्वेवर लोण देत 31-30 अशी आघाडी घेतली. शेवटी 5 गुणांनी 70 व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा चांदीचा चषक उंचविता हरियाणाच्या या विजयात आशू मलिकने 1 बोनस व 12 गुण असे 13 गुण घेत महत्वाची भूमिका बजावली. मोहित गोफ्तने 2 गुण 2 पकडीचे आणि एक अव्वल पकड करीत 2 गुण असे 6 गुण घेत त्याला योग्य साथ दिली क्रियशनने 4. तर जयदीपने 2 पकडी करीत बचावाची बाजू उत्तम सांभाळली. भारतीय रेल्वेकडून पंकज मोहीतेने 1 बोनस व 6 गुण असे 7 गुण मिळविले. एम. सुधाकरने 5 गुण घेत त्याला छान साथ दिली. सुरेंदर गित, नितेश कुमार, परवेज भेस्वावाल यांनी प्रत्येकी 3-3 पकडीत गुण घेतले. तरी देखील रेल्वेला पाचव्यांदा जेतेपद राखण्यात अपयश आते.

चंदीगडला पहिल्यांदाच उपांत्य फेरीत घेऊन जाणाऱ्या पवन शेरावतची उणीव रेल्वेता भासली असेल. स्पर्धेचे बक्षीस वितरण हॉकीचे आंतर राष्ट्रीय खेळाडू धनराज पिल्ले, शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत पार पडले. हरियाणाने अंतिम विजेतेपद मिळविल्याने महाराष्ट्राच्या खेळाडूंना व क्रीडा रसिकांना कुठे ना कुठे तरी चुटपुट लागून राहिली असेल. या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात हरियाणाने महाराष्ट्राला 38-37 असे, तर भारतीय रेल्वेने चंदीगडला 5-5 चढायांच्या डावात 43-41 असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. बाद फेरीपासूनचे सर्वच सामने चुरशीने खेळले गेले.

Exit mobile version