जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये आतापर्यंत ७२.०८ टक्के मतदान

रायगड जिल्ह्यातील वीस पैकी १६ सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज (दि.१६) रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. ६१ मतदान केंद्रावर मतदार आपला निवडणुकीचा हक्क बजावत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत २० हजार २६६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. तीन वाजेपर्यंत पर्यंत ७२.०८ टक्के मतदान पार पडले आहे. मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मतदानासाठी पाहायला मिळत आहे. पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त मतदान केंद्रावर ठेवण्यात आलेला आहे.

जिह्यातील वीस पैकी सोळा सार्वत्रिक ग्रामपंचायतीसाठी आज रविवारी (दि.१६) रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. १६ सरपंच पदासाठी ३६ उमेदवार तर १८४ सदस्य पदासाठी २४७ उमेदवार रिंगणात आपले भवितव्य अजमावित आहेत. ६१ मतदान केंद्रावर मतदान ३१ हजार २९७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

रायगड जिल्ह्यात अलिबाग ३, पेण १, पनवेल १, कर्जत २, खालापूर ४, माणगाव ३, महाड, १, पोलादपूर ४, श्रीवर्धन १ या तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. वीस पैकी पेण, कर्जत आणि पोलादपूर येथील प्रत्येकी एक अशा तीन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर अलिबाग मधील एका ग्रामपंचायतीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे. १६ ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू आहे.

Exit mobile version