नवी मुंबईत 8 कंपन्यांना भीषण आग

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वेस्ट क्लाय पॉलिकॅब नावाच्या कंपनीत ही आग लागली असून या आगीमध्ये अनेक कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या कंपनीत आग लागली आहे त्या कंपनीच्या आजूबाजूच्या कंपन्या खाली करण्यात आल्या असून त्यातील कामगारांना बाहेर काढण्यात आलं आहे. ही आग अजून आटोक्यात आली नसून भीषण रुप धारण करत असल्याची माहिती मिळत आहे. चखऊउ फायर ब्रिगेडसहित अन्य वेगवेगळ्या ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पावणे एमआयडीसीमधील ही केमिकल कंपनी असून ही आग इतकी भीषण आहे की या आगीमुळे आकाशात धूराचे लोट पसरलेले आपल्याला पहायला मिळत आहेत. तसेच कंपनीतील वरच्या भागात 4 ते 5 कामगार अडकले असल्याची माहिती मिळत असून त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं काम अग्निशामक दलाच्या जवानांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version