खेळाडू मानधनाच्या प्रतीक्षेत
| लाहोर | वृत्तसंस्था |
पाकिस्तान हॉकी महासंघ (पीएचएफ) सध्या आठ कोटी पाकिस्तानी रुपयांच्या कर्जामध्ये बुडाले आहे. यामुळेच सध्या महासंघाच्या कराची आणि लाहोर येथील मुख्य आणि लहान कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन मिळाले नाही. गत सहा महिन्यांपासून खेळाडू आणि कर्मचारी हे मानधनाच्या प्रतिक्षेत आहेत. या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधाही दिल्या जात नाहीत. पाकिस्तान टीमचे खेळाडूही देखील अडचणीत सापडले आहेत. त्यांचीही दयनिय परिस्थिती झाली आहे. त्यांना मानधन देण्यात महासंघ अपयशी ठरला आहे.
तरीही वेतनाविना हॉकीपटू गत पाच महिन्यांपासून स्पर्धांमध्ये देशांचे प्रतिनिधीत्व करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीतही पाकचे खेळाडू हे ओमान येथे झालेल्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत सहभागी झाला होता. याच स्पर्धेदरम्यान टीमचा कर्णधार शकीलसह इतर हॉकीपटूंचा व्यवस्थापनासोबत वादही झाला होता. या प्रकरणी संतप्त झालेल्या हॉकीपटूंनी पात्रता फेरीत खेळण्यासही नकार दिला होता. यादरम्यान महासंघाचे माजी अध्यक्ष खालिद यांनी यापुर्वीच्या अध्यक्षांवर आरोप केला.