रायगड जिल्ह्यात 80.27 टक्के मतदान

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी घेण्यात आली. जिल्ह्यात सरासरी 80.27 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

रविवारी झालेल्या मतदानामध्ये अलिबागमध्ये 2, पनवेल 1, कर्जत 1, खालापूर 4, माणगाव 3, महाड 1 व पोलादपूर तालुक्यातील 4 ग्रामंपचायतींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण 16 ग्रामपंचायतीच्या मतदान प्रक्रियेत 80.27 टक्के मतदान झाले. यामध्ये अलिबाग 81.89, पनवेल 92.22 कर्जत 87.09 खालापूर 81.09 माणगाव 71.35 महाड 80.50 पोलादपूर 75.27 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायत हद्दीत 31 हजार 297 मतदार असून अखेरपर्यंत 25 हजार 121 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
पोलादपूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींसाठी 75 टक्के मतदान झाले आहे.यामध्ये तुर्भे खोंड,वझरवाडी, तुर्भे बुद्रुक,तुर्भे खुर्द या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.सोमवार तहसिल कार्यालयात मतमोजणी केली जाणर आहे.

पोटलमध्ये 87.09 टक्के मतदान
कर्जत
कर्जत तालुक्यातील पोटल आणि पाली या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका दि.16 ऑक्टोबर रोजी जाहीर झाल्या होत्या. मात्र पाली ग्रामपंचायत मधील 7 सदस्यांसाठी 7 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत तर सरपंच पदासाठी 1 नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे, त्यामुळे पाली ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे, मात्र उद्याच याची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

पोटल ग्रामपंचायत मध्ये पोटल आणि आंबोट या दोन गावांचा समावेश आहे, यामध्ये 1हजार 657 मतदार असून 807 पुरुष मतदार तर 850 स्त्री मतदार आहेत, सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये सदस्यांसाठी 14 उमेदवार रिंगणात उभे आहेत तर थेट सरपंच पदाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार मतदान रिंगणात उभे आहेत. पोटल ग्रामपंचायत मध्ये आज 87.09 टक्के मतदान झाले आहे, उद्या दि.17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित खैरे यांनी दिली.

नवगाव 84 टक्के मतदान
प्रभाग क्रमांक एक मध्ये 724 पैकी 597 जणांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक दोन मध्ये 730 पैकी 613 मतदान झाले. प्रभाग क्रमांक तीन मध्ये 518 मतदारपैकी 424 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच सर्वाधिक मतदान प्रभाग क्रमांक चार मध्ये 85.92 टक्के झाले. येथे 1 हजार 158 मतदारांपैकी 995 जणांनी मतदान केले.

Exit mobile version