सर्वसामान्यांसाठी उभारणार 80 लाख घरे

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी पीएम आवास योजनेअंतर्गत 80 लाख घरे बांधण्याचे लक्ष ठेवले आहे. यिा योजनेसाठी 48 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही 80 लाख घरे देशातील विविध राज्यांमध्ये शहरी आणि ग्रामीण भागात बांधली जाणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी याचा फायदा होईल. देशातील सर्व लोकांना घरे देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना 669 जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. या योजनेअंतर्गत सरकार बेघर लोकांना घर देते. या योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानही दिले जाते. पात्र शहरी गरीबांना घर खरेदी आणि बांधण्यासाठी गृहकर्जावर क्रेडिट लिंक्ड सबसिडी मिळते. जर एखाद्या व्यक्तीने नुकतेच घर किंवा फ्लॅट घेतला असेल तर त्यालाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. तुमच्या घरावर घेतलेल्या कर्जासाठी लागणार्‍या व्याजावर सरकारकडून मिळणार्‍या सबसिडीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. यामुळे तुमच्या घराची किंमत कमी होईल, जे फायद्याचे आहे.
2015 मध्येच, पीएम आवास योजना ग्रामीण अंतर्गत अर्ज करण्यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आलं आहे. ते गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येतं. डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरच्या मदतीने लॉगिन आयडी तयार करावा लागेल. यानंतर या अ‍ॅपद्वारे तुमच्या मोबाइल नंबरवर वन टाईम पासवर्ड पाठवला जाईल. लॉगिन केल्यानंतर आवश्यक माहिती भरावी लागेल.

Exit mobile version