| पनवेल | प्रतिनिधी ।
तालुक्यातील खेरणे ग्रामपंचायती साठी सुरु असलेल्या निवडणुकीत रविवारी (ता.16) दुपारी अडीज वाजे पर्यत सरासरी 80 टक्के मतदान झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. शेतकरी कामगार पक्ष, मनसे पुरस्कृत पॅनल व भारतीय जनता पक्ष पुरस्कृत पॅनल यांच्यात थेट होत असलेल्या लढतीत मतदाना दरम्यान कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये या करता ठेवण्यात आलेल्या कडेकोट बंदोबस्ता मुळे गावात शांततेच वातावरण आहे. या निवडणुकीत एकूण 4 प्रभागांमध्ये सरपंच पदाकरीता 2 सदस्य तसेच 11 सदस्य पदाकरिता एकूण 22 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.जवळपास एक हजार 28 इतकी मतदार संख्या असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी 17 ऑक्टोबर रोजी तहसिलदार कार्यालय, पनवेल येथे होणार आहे.