14 ठिकाणी लाखांहून अधिक रक्कमेच्या दहीहंड्या; लाखोंची बक्षिसे जिंकण्यासाठी गोविंदानी कंबर कसली
दहीहंडीनिमित्त जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात
| रायगड | प्रतिनिधी |
रायगडातील गोविंदा पथकांना साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीचे वेध लागले आहेत. दहीहंडी हा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी कंबर कसली आहे. अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दहीहंड्या लावल्या जाणार आहेत.
दहीहंडीसाठी रायगड जिल्ह्यातील 14 ठिकाणी लाखांहून अधिक रक्कमेच्या दहीहंड्या तर पन्नास हजारांहुन अधिक रकमेच्या दहा दहीहंड्या अशा 24 मंडळाकडून पारितोषिकच्या दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत. मानाच्या दहीहंड्या फोडण्याबरोबरच लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी गोविंदा पथकांनीही कंबर कसली आहे.
रायगड पोलीस दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रायगडात 1863 सार्वजनिक तर 6330 खासगी अशा एकूण 8193 दहीहंड्या बांधल्या जाणार आहेत.तर 176 सार्वजनिक मिरवणुका निघणार असून त्यातील 30 मिरवणुका या मशीद,मोहल्ला, दर्गा समोरून निघणार आहेत.
दहीहंडीनिमित्त जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये. यासाठी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरपीएफ एक प्लाटून, आर.सी.पी प्लाटून दोन,स्ट्रायकिंग फोर्स पाच, 1 अ.पो. अधीक्षक, 8 उप विभा.पो. अधिकारी, 123 पो. अधिकारी, 1300 पो.अंमलदार, होमगार्ड 350 आदीचा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची अशी माहिती पोलील अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.