उरण तालुक्यात 8,444 बाप्पाची प्रतिष्ठापना

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यात मोरा, सागरी, न्हावा-शेवा या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 8,426 घरगुती, 18 सार्वजनिक अशा एकूण 8,444 श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली आहे. मागील दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साजरा करण्यास शासनाने निर्बंध घातले होते. यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्याने शासनाने निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय सर्व जाती धर्माच्या बांधवांनी घेतला आहे.

Exit mobile version