जिल्ह्यात 85 रुग्ण; एक मृत्यू तर 80 कोरोनामुक्त, 8 तालुक्यात नवीन रुग्ण नाही

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात मंगळवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी नव्याने 85 रुग्णांची नोंद झाली, उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यु झाला. तर 80 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मंगळवारी नव्यानं जिल्ह्यात पनवेल मनपा 51, पनवेल ग्रामीण 9, पेण 2, अलिबाग 16, उरण 2, खालापूर 2, मुरुड 1, श्रीवर्धन 2 असे एकूण 85 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कर्जत, माणगाव, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर, तळा, म्हसळा या 8 तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. उपचारादरम्यान कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 69 हजार 761 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 64 हजार 055 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 360 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 346 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version