अपघातात 9 ठार, 27 जखमी

। लखनऊ । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात गुरुवारी पहाट पहाटे पाचच्या सुमारास एक व्होल्वो बस आणि ट्रक यांच्यात जोरात धडक होऊन नऊ जण जागीच ठार तर 27 जण जखमी झाले आहेत. चुकीच्या बाजूने येणार्‍या वाळूच्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात डबल डेकर बस चक्काचूर झाली.

अपघातानंतर चालक पळून गेला. हा ट्रक दिल्लीहून बहराइचउत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील किसान मार्गावर दिल्लीहून बहराइचकडे जाणारी बस आणि दुसर्‍या बाजूने येणार्‍या ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी,उ.प्र.चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक प्रकट केला आहे.तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Exit mobile version