नऊ लाखाची फसवणूक करणारा पोलिसांच्या ताब्यात

| खोपोली | प्रतिनिधी |
शेअर बाजारात पैसे करण्याचे आमिष दाखवून, दर महिना 10 टक्के दराने आकर्षक परतावा देण्याचे प्रलोभन व खोटे आश्वासन देणारा फरारी दिलीप बच्छाव, (वय- 30 वर्ष, रा, उंटवाडी नाशिक) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दिलीप याने नऊ लाख रुपये स्विकारून ठरलेल्या मुदतीमध्ये मूळ रक्कम व परतावा न देता फसवणूक करून रकमेचा अपहर केल्याचा अर्ज चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिलीप बच्छाव हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. खोपोली पोलीसांनी त्यास अंबड पोलीस ठाणे, जिल्हा नाशिक येथे जावून शोध घेवून त्यास ताब्यात घेवून गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आलेले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक रायगड अतुल झेंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर विभाग विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शितल राऊत, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शितल राउत यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे हे करीत आहेत. तसेच ज्या नागरिकांची फसवणूक केली आहे त्यांनी समोर येण्याचे आवाहन केले आहे.

Exit mobile version