ट्रान्सफॉर्मर काॅईल चोरी प्रकरणी ९ संशयितांना अटक

। मुरुड । सुधीर नाझरे ।
मुरुड तालुक्यातील महालोर गावा जवळ असणा-या विज वितरण कंपनीचा ट्रान्स्फर च्या मधील तांब्याची काॅईल चोरी प्रकरणी ९ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सविस्तर असे आहे की मुरुड तालुक्यातील महालोर गावा येथील अजित सिंग यांचे मिळकतीत, मिठागर मधील-कोरली व भालगाव मधील खरवर याठिकाणी असणा-या के.व्ही.ए.क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याची काॅईल व ऑइल चोरी ची तक्रार कनिष्ठ अभियंता-विशाल इंगावले यांनी. मुरुड पोलिस ठाण्यात अज्ञात विरोधात २४/०४/२०२२रोजी तक्रार नोंद करण्यात आली होती.यावेळी साधारण १लाख ४५हजार २००रुपयांचा माल चोरी केल्याचा सांगण्यात आले.

त्यानुसार मुरुड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा रजि.नं.३९/२०२२ व ५८/२०२२ भा.द.वि.सं.कलम ३७९प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरील तपास पोलीस निरीक्षक -नितिन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार -विलास आंबेकर व पोलिस हवालदार -युवराज निकाळे करित होते. स्थानिक गुन्हा शाखा पथकांनी चोरी प्रकरणी आरोपींना मुद्देमालासह रोहा तालुक्यातील देवकान्हे आदिवासी वाडीतील संवशित आरोपी सागर वाघमारे,अक्षय वाघमारे,दिलीप वाघमारे, अनिल वाघमारे, शशिकांत वाघमारे, दत्ता वाघमारे,संदिप पवार, व दोन संवशित आरोपी रा.मणेर तालुका मुरुड येथील अक्षय वाघमारे व अभिषेक शेळके यांना पकडुन रोहा पोलिस ठाण्यात आणले असता तपासावेळी आरोपींने सदरील मुरुड पोलिस ठाण्या हद्दीत चोरी केल्याचे कबूल केले आहे.

सदरील मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार -विलास आंबेकर व पोलिस हवालदार -युवराज निकाळे यांनी सदरील आरोपीचा ताबा घेऊन मुरुड पोलिस ठाण्यात चौकशी केली असता सदरील गुन्हा कबूल केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक-नितिन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार -विलास आंबेकर व पोलिस हवालदार – युवराज निकाळे करित आहेत.

Exit mobile version