90 टक्के अधिकारी जि.प.च्या शाळेतूनच घडले- हरेश काळसेकर

| नागोठणे | वार्ताहर |

वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. या माध्यमातून त्यांच्या कलागुणांचा गौरव शिक्षण संस्थेकडून केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कौशल्याला वाव मिळतो. या गोष्टींचा विचार करून शनिवारी (दि.24) राजिपच्या नागोठणे प्राथमिक केंद्र शाळा व कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच शाळा समितीच्या सहकार्याने शाळेच्या प्रांगणात हा उपक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला. यावेळी दोन्ही शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध मराठी, हिंदी गाण्यांवर नृत्य आविष्कार सादर केले.

यावेळी नागोठणे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरेश काळसेकर म्हणाले की, सध्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण पद्धतीमध्ये जिल्हा परिषदेच्या छोट्या-छोट्या प्राथमिक शाळांमधूनही विविध उपक्रम राबवले जातात, ही कौतुकास्पद गोष्ट आहे. मी देखील जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच शिक्षण घेतलेला एक विद्यार्थी आहे. आपल्या लहानपणी इंग्रजी माध्यमाच्या शाळा नव्हत्या आणि पालकांनीदेखील याचे काही वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही. गुणवत्ता आणि हुशारी याचा शाळा कुठली आहे याच्याशी काहीही संबंध नसतो, कारण महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये आज आयएएस, आयपीएस अधिकारी त्याचप्रमाणे क्लासवन, क्लास टू अधिकारी असतील यातील 90 टक्के अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेऊनच इतकी उंचीपर्यंत पोहोचले आहेत, असे गौरवोद्गार वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी काढले.

यावेळी विलास चौलकर, किशोर म्हात्रे, म्हात्रे, शबाना मुल्ला, ज्योती राऊत, विनिता पाटील, अमृता महाडिक, पुनम काळे, भाविका गिजे, सुप्रिया काकडे, विवेक सुभेकर, डॉ.अनिल गीते, ॲड.महेश पवार, साईनाथ धुळे, सीमा शेळके, विजया धनावडे, कृती पडवळ, ज्योती शेंगदाणे यांच्यासह विद्यार्थ्यांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version