। कोलाड । वार्ताहर ।
द.ग. तटकरे माध्यमिक व उच्च माध्यमिक एचएससी परीक्षेचा निकाल 94 टक्के लागला असुन विज्ञान शाखेचा 100 टक्के, वाणिज्य शाखेचा 96 टक्के, तंत्रज्ञान शाखेचा 92 टक्के, तर कला शाखेचा 85 टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेतील शर्वरी चौधरी 84.67 टक्के गुण मिळवून प्रथम, तर प्रज्वल झोलगे 82.50 टक्के गुण मिळवून द्वितीय, मानस रटाटे 81.67 टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
इंग्रजी वाणिज्य शाखेतील गौरी पाटील 79.67 टक्के गुण मिळवून प्रथम, खुशबू मोरे 79.50 टक्के गुण मिळवून द्वितीय, प्रियांका महाडिक 79.33 टक्के गुण मिळवून तृतिय तर, वाणिज्य (संयुक्त) शाखेतील शावनी शिंदे 71.17 टक्के गुण मिळवून प्रथम, रिया महाबळे 70.67 टक्के गुण मिळवून द्वितीय, हर्षल भोसले 68.67 टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. तसेच, कला शाखेतील सिद्धी पवार 83.17 टक्के गुण मिळवून प्रथम, तनु सिंग 73.17 टक्के गुण मिळवून द्वितीय, वैशाली चिविलकर 71 टक्के गुण मिळवून तृतिय, तर, तंत्रज्ञान शाखेत देवेन रटाटे 67.50 टक्के गुण मिळवून प्रथम, शैलेश डविलकर 67 टक्के गुण मिळवून द्वितीय, ओमकार मोरे 63.50 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.