जिल्ह्यात 99 टक्के गुन्ह्यांची उकल

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात 2025 मध्ये चोरी, घरफोडी अपहरण असे वेगवेगळे तीन हजार 327 गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये तीन हजार 294 गुन्ह्यांची उकल करण्यास रायगड पोलिसांना यश आले आहे. एकूण 99 टक्के गुन्ह्यांची उकल करणात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.

पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहात आयोजित शुक्रवारी (दि. 2) पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, अलिबागच्या पोलीस उपअधीक्षक माया मोरे आदी उपस्थित होते. खुनाचे 32 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 30 गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत. दरोड्याचे 3 गुन्हे दाखल झाले होते. हे तिन्ही गुन्हे उघडकीस आले आहेत. घरफोडीचे 271 गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 173 गुन्हे उघडकीस केले आहेत. अत्याचाराचे 136 गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे सर्व गुन्हे उघड केले आहेत. त्यात 115 गुन्हे पोक्सो अंतर्गत केले आहेत. अपहरणाचे 121 गुन्हे दाखल करण्यात आले होते. 114 गुन्हे उघडकीस केले आहेत. विनयभंगांचे 156 गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 114 गुन्हे उघडकीस करण्यात यश आले आहे. रायगड जिल्ह्यात 115 ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापे टाकण्यात आले होते. त्या कारवाईत 56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर 26 कारवाया झाल्या आहेत. त्यात एक कोटी 19 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.

Exit mobile version