| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायत हद्दीतील नागशेत हे प्रसिध्द पर्यटन क्षेत्र आहे. या ठिकाणी धरण असून पावसाळ्यात शेकडो पर्यटक व स्थानिक नागरिक येथे ये-जा करीत असतात. परंतू या ठिकाणी असलेल्या मोरीची अवस्था बिकट झाली असून या मोरीवरुन पुढे जाण्याकरिता व पोहताना उतरताना स्थानिक नागरिक व पर्यटकांना कसरत करावी लागते. कधी कधी याठिकाणी पर्यटक किरकोळ जखमी झाल्याची घटना सतत घडत असल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पावसाळ्यात वर्षसहलीचाआनंद घेण्यासाठी अंबोली धरण, गारंबी, सवतकडा, नागशेत या धरणावर पर्यटक व स्थानिक येत असतात त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगार मिळत असतो. यामुळे त्यांच्या आर्थिक स्त्रोतही वाढत होत असते. त्यामुळे ही मोरी ग्रामपंचायत निधीतून किंवा जिल्हा परिषद निधीतून निधी मंजूर करुन लवकरात लवकर मोरीचे काम करुन पर्यटकांना व स्थानिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.