| आगरदांडा | प्रतिनिधी
मुरुड-जंजिरा नगरपरिषदेने लाखो रुपये खर्च करुन मच्छी विक्रीसाठी कोळी बांधवांकरिता मच्छीमार्केट बांधलं आहे. परंतु, काही विक्रेते रस्त्यावर बिनधास्तपणे मच्छी विक्रीसाठी बसत आहेत. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मच्छी खरेदीसाठी येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्याच्या बाजूलचा उभी करुन ठेवत असून, विक्रेतेसुद्धा याठिकाणी मच्छी विक्री करण्यासाठी बसत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन जाणाऱ्या-येणाऱ्या वाहन चालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे. तसेच आजूबाजूच्या दुकानदारांना व घर मालकांना यांचा त्रास होऊ लागला आहे.गर्दी हटविण्यासाठी आलेल्या ट्रॉफीक पोलिसांना याठिकाणी गर्दी हटविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.