| अलिबाग | प्रतिनिधी |
पत्नीचा खून केल्याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात मयुरेश गंभीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण भोर यांनी त्याला अटक करून अलिबाग न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 22 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मयुरेश गंभीर याने सासूचा खून केल्याप्रकरणी उरण पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयीन पोलीस कोठडी झाल्यानंतर त्याला तळोजा कारागृहात ठेवले होत. मात्र त्याने गेल्या वर्षी 26 जुलै 2022 रोजी दुसरी पत्नी प्रिती हीचा खून नागाव मधील एका हॉटेलमध्ये केल्याची माहिती पोलीसांना मिळाल्यावर अलिबाग पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्हयाचा तपास अलिबागचे उपविभागीय अधिकारी अरुण भोर यांच्याकडे सोपवण्यात आला. या घटनेनंतर मयुरेशला 14 ऑगस्टला ताब्यात घेतले. पुढील चौकशीसाठी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून त्याची कसून चौकशी अरुण भोर करत आहेत .