| अलिबाग | वार्ताहर|
तालुक्यातील रा.जि.प. केंद्रशाळा पेझारी या ठिकाणी समग्र शिक्षण अभियान, महाराष्ट्र शासन आणि प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझी ई-शाळा’ उपक्रम अंतर्गत अलिबाग तालुक्यातील 36 शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
यामध्ये डिजिटल साक्षरतेला चालना देणे, डिजिटल साधने आणि त्यांचा वापर यामधील दरी कमी करणे. शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन आणि अध्यापनामध्ये हायब्रीड लर्निंगचा वापर करून प्रगतीचा स्थर उंचावणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रशिक्षण कार्यक्रमाला केंद्रप्रमुख कृष्णा कुमार शेळके, रवींद्र साळुंखे तसेच अलिबाग तालुक्यातील शाळांचे शिक्षक उपस्थित होते.
इन्फोटेक फाऊंडेशन जिल्हा समन्वयक राकेश डिंगणकर तसेच प्रशिक्षक नंदिनी देवकर, मनीषा ठाकूर, तालुका समन्वयक प्रगती पाटील, भाग्यश्री घासे उपस्थित होते. आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक नितीश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पेझारी शाळेतील शिक्षकांनी मेहनत घेतली.