पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांचे आवाहन
| नेरळ | प्रतिनिधी |
गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांबरोबर नागरिकांनी दक्ष राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी येथे केले. भिसेगाव गाव आणि भिसेगाव परिसरात विविध इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नागरिकांशी संवाद चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन जय अंबे भवानी मंदिर सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर नगरसेविका पुष्पा दगडे, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, पोलीस पाटील संजय हजारे, जय अंबे भवानी मंदिर कमिटीचे अध्यक्ष जयराम ठोंबरे, उपाध्यक्ष रमेश हजारे, माजी नगरसेविका उज्वला हजारे आदी उपस्थित होते. यावेळी विविध सोसायटीचे पदाधिकारी दिनेश भरकले, श्रीराम दिसले, गणेश गोसावी, सुनील दिसले, अजय हजारे, सिताराम कडु, नागेश भरकले, राहुल हजारे, रोहित हजारे, प्रेमनाथ गोसावी आदी ग्रामस्थांसह पोलीस ठाण्यातील कर्मचारी संतोष साळुंखे, हर्षल जमदाडे, जयवंत काठे उपस्थित होते.