| नेरळ | वार्ताहर |
नेरळ येथील वृत्तपत्र विक्रेते बल्लाळ जोशी यांनी वयाच्या आठव्या वर्षी आपल्या घराच्या बाप्पाची गणेश मूर्ती बनविण्यास सुरुवात केली होती. आज सलग 50व्या वर्षी त्याच आकाराची आणि अगदी हुबेहूब अशी मूर्ती जोशी यांनी हाताने घडविली आहे. दरम्यान, सतत शाडूच्या मातीपासून आणि वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायात असल्याने कागद्याच्या लगद्यापासून मूर्ती बनविणारे बल्लाळ जोशी यांनी गणेश भक्ती सर्वश्रुत झाली आहे.
जोशी यांनी वयाच्या आठव्या वर्षांपासून स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. नेरळ रेल्वे स्टेशन येथे वडिलांच्या सोबत वृत्तपत्रे विकण्याचे काम करणारे बल्लाळ जोशी यांनी मागील अनेक वर्षे आपल्या व्यवसायाला साजेसे अशी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती घडविली आहे. आपल्या घरचा बाप्पा स्वतःच्या हाताने घडविला जावा असा कटाक्ष असलेले जोशी यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून ती आठवण रहावी यासाठी कागद्याच्या लगद्यापासून गणेश मूर्ती घडविण्याचे काम स्वतः आवडीने केले आहे. त्यांनी मागील 49 वर्षे घडवलेली श्रीची मूर्तीची अनेक वैशीष्ट्ये आहेत. त्यात मूर्तीचा आकाराची सारखाच, कायम एकच रंगसंगती, एकाच प्रकारची आणि पर्यावरण पूरक मूर्ती बनविण्यासाठी बल्लाळ जोशी यांना संपूर्ण कुटुंब मदत करीत असून त्यांनी घडवलेल्या बाप्पाच्या मूर्तीचे हे 50 वे वर्षे आहे.