खारगावखुर्द सकलप ग्रामस्थांचा टाहो
| म्हसळा | वार्ताहर |
गावातील सरपंच, ग्रामसेवक धनाने नको तर आम्हाला मनाने श्रीमंत असणारे आणि जनतेचे ऐकून घेत गावात लोककल्याणकारी कामे करणारे हवे आहेत, असा टाहो खारगावखुर्द सकलप ग्रामपंचायतीमधील स्वयंसेवी नागरिक फोडत आहेत. दरम्यान, सरपंच आणि ग्रामसेवक यांचे नाव न घेता त्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.म्हसळा शहराला लागूनच मोठ्या लोकवस्तीच्या खारगावखुर्द सकलप ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी ग्रामसभेत गावाची स्वच्छता आणि विकासकामांची डागडुजी करण्याबाबत ठराव संमत केला होता. मात्र, पाच वर्षे गाव सरपंच आणि ग्रामसेवकांनी जनतेच्या मागणीकडे ढुंकून पाहिले नाही, यााबबत ग्रामस्थांनी संतप्त झाले आहेत. लोकपयोगी कामाकडे सरपंचांचे दुर्लक्षामुळे गैरसोय होत असताना, ऐन सणासुदीच्या दिवसात गावातील प्रतिष्ठित स्वयंसेवी नागरिकांनी पुढाकार घेत एस.टी. निवाराशेड, स्मशानभूमी रस्ता परिसर, गाव अंतर्गत सर्वच रस्त्यांच्या आजूबाजूला वाढलेली झाडी झुडपे छाटणी करून साफसफाई केली.
गाव स्वच्छता मोहिमेत प्रामुख्याने माजी सभापती महादेव पाटील, चंद्रकांत कांबळे, कृष्णा म्हात्रे, ॲड. मुकेश पाटील, नरेश मेंदडकर, मंगेश म्हात्रे, विश्वास खोत, मनोहर पाटिल,बाळा मेंदडकर,योगेश मेंदडकर,सुभाष चव्हाण,अशोक कांबळे,हेमंत म्हात्रे,जयवंत खोत, सुनिल मेंदडकर, नारायण म्हात्रे, बाबू खोत, अशोक खोत, कृष्णा मेंदडकर, बालोजी खोत आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.