सुधीर गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन
| सोगाव | वार्ताहर |
श्री भिल्लेश्वर क्रीडा मंडळ किहीम-कामथ, ता. अलिबाग यांनी गुरुवार, दि.21 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता किहीम बाजारपेठजवळील समुद्रकिनारी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन चोंढी येथील ज्येष्ठ कुस्तीपटू व समाजसेवक सुधीर बाळू गायकवाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी अलिबाग कुस्ती तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत, श्री भिल्लेश्वर क्रीडा मंडळ अध्यक्ष प्रशांत पवार, किहीम ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते पिंट्या गायकवाड, निलेश पवार, अभिजित चव्हाण, प्रशांत नार्वेकर, भाई पोतदार, मांडवा पोलीस अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर व किहीम-कामथ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कुस्ती स्पर्धेत अनेक कुस्तीवीरांनी व कुस्ती संघांनी सहभाग घेतला. या कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी अनेक कुस्ती शौकिनांनी उपस्थिती लावली. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित हरवडे यांनी केले.