| सोगांव | वार्ताहर |
दी लाईफ फाऊंडेशनतर्फे राजिप शाळा सोगांव मराठी आणि राजिप शाळा सोगांव उर्दू येथे बुधवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दंत चिकित्सक डॉ. अक्षय कोळी आणि डॉ. निरज कोळी यांनी विद्यार्थ्यांना आपले दंत व मौखिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी विशेष असे मार्गदर्शन केले तसेच सर्व विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना दात व तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले.
यावेळी विशेष गरज असलेल्या विद्यार्थांना त्यांनी औषधे लिहून दिली. यावेळीदी लाईफ फाऊंडेशन तर्फे दोन्ही शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत टूथ पेस्ट आणि टूथ ब्रश वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वर्गाने या शिबिरासाठी उपस्थित डॉ. अक्षय कोळी व शिबिराचे आयोजक दी लाईफ फाऊंडेशनचे विशेष आभार मानले.