| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर सर्व उमेदवारांच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागल्या होत्या. अशातच शुक्रवारी (दि.6) आरक्षण जाहिर केल्याने काहींना आनंद अनावर झाला तर काहींचा हिरमोड झाल्याचे चित्र समोर आले आहे.
अलिबाग तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. यामध्ये आवास, वाडगाव, शहाबाज, किहिम, मिळकतखार, आवास, वाघ्रण, पेढांबे, नागाव, खिडकी, माणकुळे, चिंचवली, खंडाळे, कामार्ले, खानाव, रेवदंडा, कोप्रोली, नवेदर नवगाव या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
या ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच सदस्यपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. यामध्ये सरपंचपदासाठी आवास सर्वसाधारण महिला, वाडगाव अनु. जमाती, शहाबाज सर्वसाधारण महिला, किहिम सर्वसाधारण, मिळकतखार सर्वसाधारण महिला, आवास सर्वसाधारण महिला, वाघ्रण सर्वसाधारण, पेढांबे सर्वसाधारण महिला, नागाव ना.मा.प्र महिला, खिडकी अनु. जमाती, माणकुळे ना.मा.प्र महिला, चिंचवली ना.मा.प्र महिला, खंडाळे सर्वसाधारण, कामार्ले ना.मा.प्र महिला, खानाव अनु. जमात, रेवदंडा ना.मा.प्र, असे आरक्षण जाहिर झाले आहे.