| चिरनेर | वार्ताहर |
उरण तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी, कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी बोकडविरा, दिघोडे, वशेणी, घारापुरी, उलवे या नाक्यांवर पोलीस चौक्या उभारल्या. तसेच पिरवाडी चौपाटी, वशेणी या समुद्र खाडीकिनारी कंटेनरमध्ये पोलीस चौक्या उभारल्या आहेत. मात्र, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्या सध्या अडगळीत पडल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या पोलीस चौक्या विनापरवाना पडून आहेत. तर, समुद्रकिनारी ठेवण्यात आलेल्या कंटेनरची दुरवस्था झाली आहे.
मुंबई शहरावर अतिरेकी हल्ला हा समुद्र मार्गाने झाला होता. त्यामुळे मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण जासई, चिरनेर यथे कामयमस्वरुपी पोलीस असतात. अन्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्या तात्पुरत्या स्वरुपात आहेत. जेव्हा वरिष्ठांकडून नाकाबंदीचा आदेश असेल, तेव्हा याठिकाणी पोलीस तैनात असतात.
सतीश निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण







