| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीला रंग भरू लागले आहेत. खांडस ग्रामपंचायतीमधील बांगरवाडीतील भाजपासह अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. शेकापचे नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे यांच्या प्रयत्नाने हा पक्ष प्रवेश झाला. कवी बांगर यांच्या नेतृत्वाखाली बाळकृष्णा बांगारे, उमेश बांगारे, मछिंद्र बांगारे, गणेश बांगारे, राम केवारी, नरेश गावंडा, नामदेव बांगारे, शंकर बांगारे, जगदिश बांगारे, सुरज पारधी, कवीश्वर बांगारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी लालबावटा खांद्यावर घेतला आहे.
याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे माजी सभापती नारायण डामसे, शेकाप महिला आघाडी प्रमुख आणि कर्जत पंचायत समितीच्या माजी उपसभापती जयवंती हिंदोळा, कर्जत पंचायत समिती माजी उपसभापती यशवंत जाधव, कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश फराट, उपसभापती कृष्णा बदे, माजी सभापती गजानन पेमारे, अलिबाग अर्बन बँकेचे संचालक अनिल जोशी, पुरोगामी युवक संघटनेचे अध्यक्ष महेश म्हसे, तसेच प्रकाश ऐनकर, विभाग चिटणीस पांडुरंग बदे, आदिवासी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बबन भालेराव, पोशिर ग्रामपंचायतीचे सदस्य दत्ता राणे, कशेळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदित्य गायकवाड, महेश म्हसे, गणेश म्हसे, प्रकाश केवारी आदी उपस्थित होते.