| कर्जत | प्रतिनिधी |
रायगड डीएसओतर्फे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गुड शेफर्ड शाळेने विजेतेपद पटकावले. लोधिवलीच्या रिलायन्स फाउंडेशन या शाळेच्या क्रिडांगणावर स्पर्धा खेळविण्यात आल्या होत्या. रायगड जिल्हयातील सुमारे 30 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेचे पहिली फेरी दि.19, दुसरी फेरी दि.20 व दि.21 रोजी अंतिम सामना खेळवण्यात आला. बाद फेरी प्रमाणे 30 संघापैकी 8- 8 संघांची दुसरी फेरी झाली. त्यानंतर अंतिम सामना झाला. अंतिम सामना हा गुडशेफर्ड कर्जत विरुद्ध खोपोली या दोन शाळांमध्ये खेळवण्यात आला. अटीतटीच्या सामन्यात कर्णधार रोहित शिंदे याने टिच्चून गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. गुड शेफर्डच्या प्राध्यापिका सिस्टर अमला, प्रशिक्षक श्रीकांत चव्हाण हुसेन जमली, सपना शिंदे व जिल्हा क्रीडा अधिकारी उपस्थित होते.