| नागोठणे | वार्ताहर |
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या 20 लाख रुपयांच्या सी.एस.आर. निधीतून नागोठण्याजवळील कडसुरे गावातील शुद्ध पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन ना. उदय सामंत यांच्या हस्ते बुधवारी (दि.25) सायंकाळी संपन्न झाले. त्यावेळी रिलायन्सचे उपाध्यक्ष गौतम मुखर्जी, जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे, कामगार नेते दीपकभाई रानवडे, उद्धव कुथे, ॲड.मनोजकुमार शिंदे, नीलम शिर्के-सामंत, रोहाच्या उपाधिक्षक सोनाली कदम, नागोठणे सपोनि संदीप पोमण, सामाजिक कार्यकर्ते अरुणभाऊ शिर्के, विकासभाऊ शिर्के, प्रमोद मोरे, उपतालुकाप्रमुख मनोज खांडेकर, वर्षा सहस्रबुद्धे, बेणसे उपसरपंच प्रीती कुथे, वरदा कुलकर्णी आदींसह कडसुरे ग्रामस्थ व विभागातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कडसुरे ग्रामस्थ दिलीप शिंदे, पांडुरंग शिंदे, दत्तात्रेय शिर्के, महेश शिंदे, भानुदास शिंदे, संदीप शिंदे, समाधान शिंदे, काशिराम गव्हंडकर, धनंजय महाडिक, अनिल शिंदे आदींसह ग्रामस्थांनी व महिला मंडळाने सहकार्य केले. कार्याक्रमचे प्रास्ताविक दत्तात्रेय शिर्के यांनी केले, तर आभारप्रदर्शन विकास शिर्के केले.







