| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
गेल्या काही दिवसांपासून नागाव, आक्षी, रेवदंडा परिसरात बिबट्या असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. रविवारी सकाळी वन विभागाने आक्षी समुद्रकिनारी पाहणी केली. यावेळी त्यांना ठसे सापडले असून ते ठसे बिबट्याचे असण्याची शक्यता असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. नागरिकांनी घाबरु नये, तसेच रात्रीच्या वेळी लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.