पुन्हा कोरोनाचा फैलाव होण्याची ग्रामस्थांना भीती
उरण | वार्ताहर |
करंजा गावात कोरोनाच्या तिसर्या लाटेची लक्षणे ही राज्यातील, परराज्यातील व इतर गावातील खलाशी व व्यवसायासाठी आलेल्यांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता ग्रामस्थांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तशा प्रकारचा मेसेज व्हाट्सएप ग्रुपवर व्हायरल झाला आहे.
दररोज बदलत्या ऊन पाऊस हवामानामुळे साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने ताप, सर्दी, खोकला अशा आजाराने अनेकांना ग्रासले आहे. करंजा गावातील सर्व दवाखान्यात उपचारासाठी गर्दी असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यावर प्रशासन काय उपाययोजना करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.






