। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।
गेल्या 44 दिवसांपासून 10 संघात सुरू असलेली स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023ची फायनल मॅच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाली आहे. भारतीय संघ ज्यांनी स्पर्धेत एकही लढत गमावली नाही आणि प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया ज्यांनी सर्वाधिक 5 विजेतेपद आणि विक्रमी आठव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.
भारताविरुद्धच्या विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारताला प्रथम फलंदाजीची संधी दिलेली आहे. अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
भारतीय संघाचे शिलेदार: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन: डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवुड.