। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढतीच असुन रविवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी नव्याने 184 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 86 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
रविवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 78, पनवेल ग्रामीण 21, उरण 4, खालापूर 5, कर्जत 13, पेण 5, अलिबाग 31, माणगाव 5, तळा 1, सुधागड 1, महाड 19 तर पोलादपूर 1 असे एकूण 184 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर मुरुड, रोहा, श्रीवर्धन, आणि म्हसळा या 4 तालुक्यात आज एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. त्याचप्रमाणे तर पनवेल ग्रामीणमध्ये 3, महाड मध्ये 3, पेन आणि महाड या तालुक्यात प्रत्येकी एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 64 हजार 715 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 58 हजार 951 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 4 हजार 176 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 1 हजार 588 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.