| मुंबई | वृत्तसंस्था ।
छगन भुजबळ यांच्यासोबत कोणत्याही मंचावर जाणार नसल्याचं जाहीर करणाऱ्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकवार आपली भूमिका बदलली आहे. ओबीसींच्या हिताच्या रक्षणासाठी आपण हिंगोली येथे होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला जाणार आहोत असे त्यांनी शनिवारी जाहीर केले.
भुजबळ तसेच इतरांचा अनेकदा फोन आल्याने आणि ओबीसींच्या ऐक्याच्या भावनेला छेद जाऊ नये म्हणून मी मेळाव्याला जात आहे असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसींचा सर्वपक्षीय पहिला मेळावा झाला होता. त्यानंतर, ओबीसींच्या आरक्षण लढ्यात दोन समाजामध्ये विष पेरणं चुकीचं आहे. त्यामुळे यापुढे मी भुजबळांच्या मंचावर कुठल्याही कार्यक्रमात जणार नाही, असे ते म्हणाले होते.