| रसायनी | वार्ताहर |
युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे वार्षिक प्रशिक्षण शिबीर आणि ब्लॅक बेल्ट एक्साम पार पडले. या शिबिरामध्ये खालापूर, पनवेल, खोपोली, पेण, कर्जत, तालुक्यातील एकूण 70 कराटेपटू सहभागी झाले होते.
या शिबिरात ब्लॅक बेल्ट एक्साम आणि डिग्री एक्साममध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
ब्लॅक बेल्ट:- राजेंद्र कान्हेरे, प्रथम बहिरा, पंक्ती पाठक, हर्षल घरत, किसन बोगटी, सानवी जाधव, आदित्य खाडे, जयराज बोराडे, हार्दिक तुरे, ऋतुजा जाधव, संदेश सुनार, धनंजय शर्मा. प्रथम डिग्री ब्लॅक बेल्ट :- आस्था चौधरी, रुत्वी पाटील, आलोक निर्मल, कृपाश्री शेट्टी,अथर्व रांजणे. तृतीय डिग्री ब्लॅक बेल्ट :- परशुराम शेट्टीगिरी हयांनी सुयश संपादित केले.
शिबिरादरम्यान महाराष्ट्र पोलीस कमांडो ट्रेनर हांशी प्रदीप मोहिते, शिहान सुनील वडके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच शिहान रवींद्र म्हात्रे, सागर कोळी, पियुष सदावर्ते, निलेश भोसले, प्रशांत गांगुर्डे, सेन्सई भालचंद्र भोईर, जीवन धाकवळ, संदीप आगीवले, संजय पाटील, प्रवीण पाटील, प्रतिक कारंडे यांनी प्रशिक्षण दिले. सर्व उत्तीर्ण खेळाडूंचे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाचे अध्यक्ष रेंशी डॉ. मंदार पनवेलकर यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.