333 खेळाडू नशीब अजमावणार
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयपीएल 2024 साठी लिलावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मंगळवार दि.19 रोजी दुबाईमध्ये लिलाव पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी एक वाजता लिलावाला सुरुवात होणार आहे. 333 खेळाडू लिलावात नशीब अजमावणार आहेत. त्यापैकी 214 खेळाडू भारतीय, तर 119 खेळाडू परदेशी आहेत.
लिलावात नावं दिलेल्या 333 खेळाडूंपैकी दोन खेळाडू असोशिएट देशांचे आहेत. 116 खेळाडू आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत, तर 215 खेळाडू अनकॅप आहेत. 23 खेळाडूंनी आपली मूळ किंमत दोन कोटी रुपये ठेवली आहे, तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये इतकी आहे. दहा संघांमध्ये फक्त 77 खेळाडूंसाठी जागा शिल्लक आहे, त्यामध्ये 30 जागा या विदेशी खेळाडूंसाठी राखीव आहेत.
बोली लागणारे खेळाडू हॅरी ब्रूक, ट्रेविस हेड, करुण नायर, मनीष पांडे, पॉवेल, रुसो, स्टिव्ह स्मिथ, कोइटजे, पॅट कमिन्स, वानंदु हसरंगा, डॅरेल मिचेल, ओमरजाई, हर्षल पटेल, रचिन रवींद्र, शार्दूल ठाकूर, ख्रिस वोक्स, लॉकी फर्गुसन, जोश हेजलवूड, जोसेफ अल्जारी, मधुशंका, शिवम मावी, चेतन सकारिया, मिचेल स्टार्क, जयदेव उनादकट, उमेश यादव.