। छ. संभाजीनगर । वृत्तसंस्था |
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील रविवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर येथील मगॅलेक्झीफ या खासगी रुग्णालयात दाखल झाले. सातत्याने सभा आणि त्यातील भाषणांमुळे जरांगे यांना खोकल्याचा त्रास जाणवत आहे. शिवाय थंडी वाढल्यामुळे ताप आणि सर्दीचाही त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने जरांगे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले. आज सकाळीच अंतरवाली-सराटी येथे ते क्रिकेट खेळले होते. मराठा आरक्षणाच्या लढ्याचे मैदान गाजवणारे मनोज जरांगे मैदानावर फटकेबाजी करताना दिसले. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्यामुळे काही दिवस ते रुग्णालयातच थांबणार आहेत.






