| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचा सामनावीर उस्मान ख्वाजा पहिल्या कसोटीत वादग्रस्त ठरला होता. त्याने आयसीसीची परवानगी न घेता पॅलेस्टाईनच्या समर्थनात काळी पट्टी घालून मैदानावर उतरला होता. त्यानंतर त्याला आयसीसीने फटकारले होते. आता दुसऱ्या कसोटीत उस्मान ख्वाजाचा शूज चर्चेत आला आहे. दुसऱ्या कसोटीत उस्मान ख्वाजा आपल्या मुलांचे नाव लिहिलेला शूज घालून मैदानात उतरला. याची परवानगी ख्वाजाने आयसीसीने घेतली नाही.







