| उरण | वार्ताहार |
कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरिटाईम ॲन्ड जनरल कामगार संघटना हि कामगारांना न्याय देणारी रायगड व नवी मुंबई मधील एकमेव संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून सन 2023 या वर्षातील 15 वा पगारवाढीचा करार आज शेलघर येथील कार्यालयात करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना तीन वर्षांसाठी 8000 रुपये पगारवाढ, दोन रजा वाढ, 3 लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी,बोनसमधे दरवर्षी 1500 रुपयांची वाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे. कामगारांना एक वर्षाची फरकाची रक्कम थकबाकी पोटी मिळणार आहे.
एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत असतांना स्थानिक कामगारांची नोकरी साबूत ठेवणे व त्यांना वाढणाऱ्या महागाई नुसार पगारवाढ करून देणे हा सध्याच्या परिस्थितीत संघटनेची महत्वाची जबाबदारी आहे असे कामगार नेते महेंद्र घरत या प्रसंगी सांगितले.या करारनाम्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष महेंद्रघरत, कार्याध्यक्ष पि.के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील तर व्यवस्थापनातर्फे मर्स्कचे आय.आर.हेड योगेश ठाकूर,फ्युचर्झ स्टफिंगचे सि.ओ.ओ. चिराग जागड तसेच कामगार प्रतिनिधी दीपक पाटील, शरद तांडेल, जयवंत पाटील, नारायण पाटील उपस्थित होते.







