| पनवेल | वार्ताहर |
खारघरमधील तळोजा फेज 2, रांजणपाडा रोड, खारघर मेट्रो स्टेशन अशा विविध ठिकाणी अनधिकृत पान टपार्या, झोपड्या, वडापावची दुकाने उभारण्यात आली होती. आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनूसार प्रभाग समिती ङ्गअफ चे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी अतिक्रमण विभागाच्यासाह्याने तसेच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तामध्ये तोडक कारवाई केली. यावेळी जेसीबी, डम्परच्या साहाय्याने अनधिकृत 17 पान टपार्या, 3 वडापाव दुकाने, 3 हातगाड्या, 4 झोपड्या तोडण्यात आल्या.
याचबरोबर प्रभाग ड चे प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी प्रभाग समिती डच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने ठाणा नाका, गार्डन हॉटेल परिसर, स्वामी नित्यानंद मार्ग, महापालिका मुख्यालय , नंदनवन कॉम्प्लेक्स जवळ, पनवेल बस स्थानकाबाहेर अतिक्रमण कारवाई करण्यात आली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अतिक्रमण कारवाईमध्ये 10 अनधिकृत उभारलेल्या पान टपर्या, दोन झोपड्यांवरती तोडक कारवाई पोलीस बंदोबस्तामध्ये जेसीबीच्या साहाय्याने करण्यात आली.







