सुप व्यावसायिकांना सुगीचे दिवस; गणेशोत्सवसाठी बाजारपेठ सज्ज !
। महाड । जुनेद तांबोळी ।
जुलैमध्ये आलेल्या जलप्रलयात पूर्णपणे वाहून गेलेल्या महाडच्या बाजारपेठेने पुन्हा एकदा श्रीगणेशा केला असून,तोंडावर आलेल्या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी महाडचे व्यापारी सज्ज झालेले आहेत. बाजारपेठही गणेशोत्सवासाठी लागणार्या विविध वस्तुंनी सजली आहे. महाडला 26 जुलैला आलेल्या जलप्रलयाचा मोठा तडाखा बसलाय.त्या महापुरात बाजारपेठेचे मोठे नुकसान झालेले आहे. सर्वच व्यावसायिक अपरिमित असे नुकसानही झालेले आहे.त्यातून सावरत व्यापार्यांनी पुन्हा एकदा व्यवसायाला प्रारंभ केला आहे.
सुपांप्रमाणेच गुलाल, हळद,अभिर, अष्टगंध, खारीक, बदाम, सुपारी आदी पुजेच्या वस्तुंना मागणी वाढली आहे. आरासीसाठी लागणारे साहित्य, प्लॅस्टिकच्या फुलांच्या माळा, मण्यांचे हार नारळ अगरबत्ती कापड काजु मोदक काजु गोळे आणी गणपतीसाठी कापड असे आकर्षक सामान बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे.येत्या चार दिवसात बाजारात खरेदी,विक्रीला जोर येईल,अशी अपेक्षा व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.
औसासाठी सुपांची निर्मिती
गणेशोत्सवामध्ये गौरी पूजनासाठी कोकणात औसा महत्वाचा सण असल्याने यासाठी बांबूची सुपे पुजण्याची परंपरा आहे. त्यासाठी हजारो सुपांची निर्मिती करण्याचे काम बुरुड समाजातर्फे सुरु झालेले आहे. बंदी सुपांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने या वर्षी एक सूप 200 ते 250 रुपये तर लहान सुपे 100 ते 150 रुपयांना विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झालेली आहेत. महाड मध्ये 1300 पेक्षा जास्त गौरींचे आगमन व पूजन करण्यात येणार आहे.त्यामुळे तेवढी सुपे विकली जाणार असा अंदाज बुरुड समाजाने व्यक्त केला आहे.