| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील नारायण बुधाजी पाटील यांचे 29 डिसेंबर रोजी निधन झाले. निधना समयी ते 85 वर्षाचे होते. ते मुंबई-ठाणे-मुलुंडमध्ये व्यवसायीक म्हणून प्रसिध्द होते. त्याचा सामाजिक कार्यात मोठा सहभाग असायचा. त्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुलगे, विवाहित तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार होता. त्याचे दिवसकार्य 9 जानेवारी रोजी राहत्या घरी नवखार- मोरापाडा येथे होणार आहेत असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.







