| माथेरान | वार्ताहर |
माथेरानच्या वीर सुपुत्र अण्णासाहेब उर्फ भाई कोतवाल यांनी दि.2 जानेवारी 1943 याच दिवशी ब्रिटिश सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकून हौतात्म्य पत्करून आपला देह भारतमातेच्या कामी आणला होता. यांच्या 81 व्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी 2 जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता नौरोजी उद्यानातून मशाल फेरी काढण्यात आली. त्यानंतर नौरोजी उद्यानातील भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्याला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल इंगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी मुकादम अन्सार महापुळे, नरेंद्र सावंत, गिरीश पवार, लक्ष्मण दरवडा, वनिता दिघे तसेच गावातील नागरिक तसेच काही माजी लोकप्रतिनिधी, शालेय विद्यार्थी, नगरपरिषदेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.