| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील जांभिवली येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय गौरकामत येथे कला क्रीडा महोत्सव आणि स्नेहसंमेलन तसेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. अजिंक्य भोईर यांचे हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रिया सोनावणे, नेहा पाटील, दिव्या ढुमणे यांनी काम पाहिले. वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात प्रकल्प समन्वय म्हणून अंकिता आंबोरकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद किरंगे, भूपेंद्र महाजन यांनी काम पाहिले. दुसर्या दिवशी विद्यार्थ्यांचे विविध गुण दर्शन कार्यक्रम सादर झाले आणि कला आणि क्रीडा महोत्सवात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच आशा पवार, योगेश देशमुख, प्रमोद पाटील, सुरेश पाटील, मुरलीधर राणे, कांचन थोरवे, प्रतिभा देशमुख, वेदिका रोकडे, प्रभावती देशमुख, दशरथ मुने, प्रियांका रोकडे, उज्ज्वला ठाकरे, प्रगती मुने, सुधाकर घुले आदी उपस्थित होते.





