| पनवेल | वार्ताहार |
कळंबोली अग्निशमन केंद्रामध्ये प्राणिक हिलिंग थेरेपीवर माहिती व प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न झाला. प्राणिक हिलिंग थेरेपीमध्ये भाजणे, कापणे विविध शारीरिक व मानसिक आजार तसेच लहान मुलांसाठी त्यांचे अभ्यासातील लक्ष केंद्रित करणे, मोबाईल अडिक्शन घालवणे, तसेच अती ताण पडल्यामुळे होणारे त्रास आदीबाबत माहिती देण्यात आली. या प्रसंगी कर्मचारी आणि कर्मचारी कुटुंबातील सदस्य तसेच लहान मुलांनी सदर कार्यक्रमातून मिळणाऱ्या माहितीचा लाभ घेतला. तसेच उपस्थित अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कौटुंबिक सदस्यांनी देखील प्रत्यक्ष अनुभव घेतला. हार्ट मेडीटेशन करून एक सुंदर अनुभव घेतला. हा कार्यक्रम मधुरता फाऊंडेशन व मैत्रेय प्राणिक हिलिंग सेंटर पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. यात मुख्यत: श्वेतिका मोरे यांनी संपूर्ण नियोजन केले. बिनिता शर्मा, शैलेंद्र हनुमंते, मेघना कदम, सई कुळकर्णी यांनी या कार्यक्रमात प्रमुख सहभाग घेतला. स्टेशन ऑफिसर सौरभ पाटील व सब ऑफिसर दिलीप पाटील यांनी अशाप्रकारचा कर्मचाऱ्यांच्या हिताचा कार्यक्रम करून एक चांगला पायंडा पाडला आहे. तर मयूर भोईर यांनी या सर्व नियोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडली.