| अलिबाग | वार्ताहर |
रोहा येथील ज्येष्ठ नागरिक संघटना सभागृहात कोकण एज्युकेशन सोसायटीच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा स्नेहमेळावा रविवार दि.7 जानेवारी रोजी उत्साही वातावरणात पार पडला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मुख्याध्यापक सदानंद रामकृष्ण मेहेंदळे होते. यावेळी अशोक देशमुख व बळवंत वालेकर, बी.पी.म्हात्रे, पी.डी.साठे, उल्हास ठाकूर, भारती हळदवणेकर ,शेषराव सोनुने, बाळकृष्ण भादेकर, डॉ.श्रीकांत पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळवंत वालेकर यांनी केले. तर अ.प्र.देशमुख यांनी एच.एम.मेळावा ग्रुपचा इतिहास कथन केला.यावेळी पी.जी.कुळकर्णी, र.ग.पाडगे, सु.ना कुळकर्णी, के.रा.आठवले, ग. द. टिल्लू, सी. बी. घाटे, वा. ग. रानडे, शि. अ. शुक्ल यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच संस्थेचा विस्तार करणारे माजी संस्थाध्यक्ष स्व.दत्ता पाटील व माजी ज्येष्ठ संचालक स्व.प्रभाकर पाटील यांनाही विनम्र आदरांजली वाहण्यात आली. स्नेहमेळाव्यतील सत्तरहून अधिक मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज.शि.जांभळे यांनी केले तर आभारप्रदर्शन भारती हळदवणेकर यांनी केले.







