| ठाणे | प्रतिनिधी |
पोलीस आयुक्तालय ठाणे शहर पोलीस कलामंच यांच्या विद्यमाने डोंबिवली पूर्व फडके रोड येथे नुकतेच हॅप्पी स्ट्रीट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय घाटकोपर झोन डोंबिवली सेंटरच्या माता भगिनी, भाई तसेच परिमंडळ 3 कल्याणचे पोलीस आयुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील कुराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी पोलीस हासुद्धा माणूसच आहे, त्यांनासुद्धा आनंद घेता आला पाहिजे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विष्णूनगर पोलीस ठाणे आणि रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचार्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध गाण्यांचे गायन करीत उपस्थितांचे मनोरंजन केले. यावेळी शिक्षण महर्षी केशव भोईर परिवार, दिवाकर परिवार उपस्थित होते. प्रेक्षकांनीसुद्धा या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला.