| माणगाव | वार्ताहर |
राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मुस्लीम मराठीसाहित्य संमेलन सोलापूर येथे रविवारी (दि. 7 ) संपन्न झाले. या संमेलनात सायराबानू चौगुले यांनी लिहिलेले वैचारिक कवड या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा लेखिका प्रा. डॉ. अर्जिनबी युसू शेख या उपस्थित होत्या. सदरचा पुस्तक प्रकाशन सोहळा स्वागताध्यक्षा सुरय्या जहागीरदार, डॉ. अजीज नदा, प्रा. तांबोळी, प्रा. शकील शेख, अनिसा शेख, अय्युब नल्लामंदू, अँड. हाशम पटेल, खाजाभाई बागवान आदी मान्यवरांच्या हस्ते व उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. कवयत्री चौगुले यांचे वैचारिक कवड हे दुसरे पुस्तक देखील वाचनीय असून संमेलनाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.