| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये हिंदी विभाग अंतर्गत विश्व हिंदी दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवसाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन विभागामार्फत करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालय पेझारी , अलिबाग येथील प्र. प्राचार्य तसेच हिंदी विभाग प्रमुख डॉ. संगीता चित्रकोटी, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे तसेच कला विभाग प्रमुख प्रा.नम्रता पाटील, हिंदी विभाग प्रमुख प्रा.पल्लवी पाटील व सहाय्यक प्रा. योगिता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. संगीता चित्रकोटी यांनी म विश्व हिंदीफ दिनाचे महत्त्व सांगितले व विश्वामध्ये हिंदीचे स्थान व त्याची पार्श्वभूमी याचे विस्तृत वर्णन केले. तसेच हिंदी भाषा आणि हिंदी भाषेतील रोजगाराच्या संधी याचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना विश्व हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना विश्व हिंदी दिनाच्या शुभेच्छा देताना हिंदी भाषेचे महत्व व हिंदी भाषेचा वापर व हिंदी भाषेची व्याप्ती समजावून सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार तृतीय वर्ष हिंदी विभागातील विद्यार्थीनी मृदुला माळी हिने केले. या कार्यक्रमाला पूर्णत्वास नेण्यासाठी हिंदी विभाग प्रमुख प्रा. पल्लवी पाटील व सहयोगी प्रा.योगिता पाटील यांनी मार्गदर्शन केले.